मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना भेटणार, भाजपा आणि शिवसेना शिंदे
गटाचे पदाधिकारी बांधकाम कामगारांच्या प्रश्ना संदर्भात आक्रमक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासना मार्फत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगार व इतर कामगार यांची नोंदणी करुन घेऊन त्यांना अनेक प्रकारचे लाभ व आरोग्य योजना मिळवून देण्याचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र शासनाने चालू केलेला आहे. परंतु शासनाच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या कामगारांना मागील काही दिवसापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदरील योजना ही कामगार घर बसल्या आपल्या मोबाईल द्वारे अथवा आपल्या गावाजवळील घराजवळील ऑनलाईन सेंटर मधून BOCW च्या वेबसाईटवर फॉर्म भरुन घेत होतो. मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या आचार संहितेच्या पार्श्व भुमीवर वेबसाईट बंद करुन मा. उच्च न्यायलय, मुंबई यांचा ०८ नोहेंबर २०२४ वेबसाईट व नोंदणी कोणत्याही नवीन नियम व अटी न घालता पुर्ववत सुरु ठेवण्यात यावी असा आदेश असतानाही रिट याचिका नं.३३५९७/२०२४ अचानक कोणतीही पुर्व सुचना कामगारांपर्यंत पोहोचोविता अचानक कामगार नोंदणी ही BOCW च्या वेबसाईटवरुन बंद करुन फक्त आणि फक्त सुविधा केंद्रावरच करण्यात यावी. असा आदेश दिला व केंद्राचे वाटप करुन केंद्रावर नोंदणी व नुतनीकरण प्रक्रिया सुरु केले आहे.
सदर सुविधा केंद्रावर जावून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे हे कामगारांस अत्यंत खर्चिक व त्रासदायक होत आहे. यातील अनेक कामगार हे ग्रामीण व दुर्गम भागातील रहिवाशी असुन पोहोचू शकत नाहीत व त्यांना सदरील सुविधा केंद्रा पर्यंत जाण्याकरीता व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याकरीता प्रचंड खर्च होत असुन फक्त आणि फक्त ठेकेदारांना सुविधा केंद्राची ठेकेदारांना पोसण्याकरीता सदरील कामगारांची सदरील सुविधा केंद्रा पर्यंत ऑनलाईन नोंदणी ही बंद केलेली असून सदर नोंदणी सुविधा ही पूर्वी प्रमाणे ऑनलाईन करावी अशी मागणी निवेदनाद्वारे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
0 Comments