मुलींनी स्वतःच्या पायावर उभा रहावे तहसीलदार शिल्पाताई ठोकडे
करमाळा (कटूसत्य वृत्त):- पुरुषाबरोबर स्त्रिया सर्व क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत असून स्वतःच्या पायावर उभा राहूनच आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करावे हीच खरी सावित्रीबाई फुले यांना श्रद्धांजली ठरेल असे मत तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी व्यक्त केले श्रीमती गंगुबाई संभाजी शिंदे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन तळपाडे शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल विजयराव पवार शिवसेना उपतालुकाप्रमुख अंकुशराव जाधव डॉक्टर गौतम रोडे बाळासाहेब वाघ करमाळा शिवसेना समन्वयक निलेश शेठ राठोड ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर प्राध्यापक अशोक नरसाळे आधी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संस्थेचे चेअरमन तथा शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी बोलताना तहसीलदार शिल्पाताई ठोकडे म्हणाल्या सावित्रीबाई फुलेंनी समाजात स्त्रियांना मानाचे स्थान देण्याचे काम केले आहे चूल आणि मूल या संस्कृती मधून बाहेर पडण्यास पालक तयार नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे शिक्षणाची कास धरून प्रत्येक मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःची स्वतंत्र प्रतिमा तथा व्यक्तिमत्व तयार करावे एक स्त्री शिकली तर तर त्याचे संपूर्ण कुटुंब सासर व माहेर या दोन्ही घरात प्रगती होऊ शकते यामुळे मुलींनी शिक्षण घ्यावी काळाची गरज आहे तहसीलदार शिल्पाताई ठोकळे म्हणाल्या,
यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन तळपाटे यांनी तब्बल एक तासाच्या आपल्या भाषणातून संपूर्ण जीवन प्रवास विद्यार्थ्यांपुढे मांडला कॉलेजमधून संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोफत शिक्षण मिळत असून त्याचा आपण फायदा घ्यावा असे आवाहन केले
यावेळी बोलताना दिग्विजय बागल म्हणाले की , जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी नर्सिंग कॉलेज चालू करून विद्यार्थ्यांना चांगली संधी दिली आहे रुग्णांसाठी मोफत दवाखाना सुरू करण्याचे शिवसेना कार्यकर्त्यांचे स्वप्न आम्ही सगळेजण मिळून पूर्ण करणार असल्याचे सांगितले
0 Comments