सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेऊन स्वावलंबी बना
तृप्ती खरे : तालुकास्तरीय किशोरी हितगुज मेळावा, विविध स्पर्धांचे आयोजन
पोखरापूर :(कटूसत्य वृत्त) :-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आजच्या प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी बनून ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन तृप्ती राजू खरे यांनी केले.
मोहोळ तालुक्याच्या वतीने तालुकास्तरीय किशोरी हितगुज मेळावा घेऊन सावित्रीबाई फुले यांची जयंती तीर्थक्षेत्र वडवळ येथील भक्त निवास येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे यांच्या पत्नी तृप्ती खरे यांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, सहाय्यक गटविकासाधिकारी विजय देशमुख, शिक्षण विस्ताराधिकारी मल्लिनाथ स्वामी, कार्यक्रमाच्या अध्यक्ष सई करंडे, प्रमुख पाहुणे म्हणून अमृता पाटील, नागनाथ देवस्थान पंचकमिटी अध्यक्ष श्रीकांत शिवपुजे महाराज, सद्गुरु नागनाथ महाराज, अन्नछत्र मंडळ अध्यक्ष शाहू धनवे आदींसह शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. यावेळी योग प्रात्यक्षिके पुष्पा कांबळे, वनिता गवळी, नंदा राऊत व चारुशिला गुरव यांनी घेतली.
युवा उद्योजक विद्या पाटील व डॉ. शशिकला सुरतकर या कर्तृत्वान महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. डॉ. स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके, अहिल्या कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या गीत मंच टीमने बहारदार असे गीतगायन केले. रांगोळी, चित्रकला, लिंबू चमचा आणि पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आल्या. सूत्रसंचालन सारीका पलंगे व प्रतिभा कांबळे यांनी केले.
0 Comments