Hot Posts

6/recent/ticker-posts

अग्निशमन केंद्राला निधी देण्याची मागणी

 अग्निशमन केंद्राला निधी देण्याची मागणी



उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आ. खरेंना सकारात्मक प्रतिसाद

पोखरापूर : (कटूसत्य वृत्त) :-
मोहोळ नगरपरिषदेला मंजूर असलेल्या अग्निशमन केंद्र व वाहनाला तात्काळ निधी मिळण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्यांकडे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केली होती, त्यांच्या मागणीनुसार शासनाच्या जीआरला अनुसरून कार्यवाही करावी असा शेरा उपमुख्यमंत्र्यांनी पत्रावर दिला असून यामुळे अग्निशामक वाहनाला तत्काळ निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार राजू खरे यांनी मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. मोहोळ नगरपरिषदेला मंजूर अग्रिशमन केंद्र व वाहनासाठी तत्काळ निधी मिळण्याची मागणी केली. शासनाने अग्निशामक केंद्र व वाहनाला रु. १ कोटी ५९ लाथ एवढया रक्कमेची मान्यता दिली होती. त्यामधील ३९ लाख एवढी रक्कम मोहोळ नगरपरिषदेला वितरीत केली आहे. राहिलेली रक्कम शासनाने अद्याप वितरीत केली नाही. आमदार खरे यांच्या पत्रावरच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रधान सचिव नगरविकास विभाग यांना 'अ' प्रमाणे कार्यवाही करावी असा आदेश दिला असून यामुळे नगरपरिषदेला अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

चौकट

बंद दाराआडचा तपशील लवकरच जाहीर करणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंद दाराआड तब्बल ३५ मिनिटे चर्चा झाली. त्याचा तपशील मी वेळ आल्यावर जाहीर करेन मात्र काही दिवसांत ना. एकनाथ शिंदे हे मोहोळ च्या दौऱ्यावर येणार आहेत. मोहोळ शहर व तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. 'राजू तुला आमदार झालेले मला बघायचे होते. आज तू आमदार झालास तुझ्या पाठीमागे मी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे' असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाल्याचे आमदार राजू खरे यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments