Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी महाविद्यालयात रेशीम कोष उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 लोकमंगल कृषी महाविद्यालयात रेशीम कोष उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे दिनांक ०४ जानेवारी रोजी चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यामार्फत शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे हे लाभले. उपस्थित शेतकरी तथा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नान्नज येथील  रेशीम कोष निर्मितीमधील युवा उद्योजक श्री. विभुते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सदरील कार्यशाळेची सुरुवात उपस्थित मान्यवर तथा शेतकरी बांधव तसेच महिला शेतकरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर उपस्थितांना लोकमंगल शैक्षणिक संकुल, संलग्नित महाविद्यालये आणि त्यातील विद्यार्थी केंद्रित विविध उपक्रम तसेच रेशीम कोष उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळा याबाबतची ओळख प्रास्ताविकाच्या माध्यमातून कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नवनाथ गोसावी यांनी करून दिली. प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री. विभुते यांचा  परिचय लोकमंगल कृषी महाविद्यालयातील कीटक शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका खोबरे मॅडम यांनी सर्वांना करून दिला. स्वतचं व्यवसाय सुरू असताना देखील नवीन काही तरी करून कमी जागेतून जास्त उत्पादन मिळवण्याची आणि गेली २ वर्षे ह्या क्षेत्रात उलेखनिय कामगिरी करणाऱ्या अशा युवा शेतकऱ्याचा सन्मान कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते शाल,भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या समवेत त्यांच्या यशस्वी प्रवासातील त्यांचे सोबती गणराज मुळे यांचा देखील सन्मान याप्रसंगी भेटवस्तू व शाल देऊन करण्यात आला. सदरील कार्यशाळेत सर्वप्रथम चित्रफितीच्या माध्यमातून अंतिम वर्षातील विद्यार्थी प्रतिनिधी कु. दिव्या कोरेकर हिने तुती लागवड तसेच केशव जगदाळे ह्याने रेशीम कीटक संगोपन आणि मीनल कस्तुरे हिने रेशीम शेती करताना मिळणारे सरकारी अनुदान यांनी लोकमंगल कृषी महाविद्यालयात मॉड्युल अंतर्गत यशस्वीरित्या सुरू असलेल्या रेशीम कोष उत्पादन याची  शास्त्रोक्त माहिती दिली. यामध्ये  रेशीम शेती मधील कमी जागा कमी वेळ यातून मिळणारे अधिक उत्पन्न तसेच रेशीम शेती ची वाढती मागणी भविष्यातील त्याची मागणी तसेच एक घरगुती शेतीला जोड धंदा हा कसा ठरू शकतो यावर त्यांनी प्रकाश टाकला. लोकमंगल कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्या मार्फत सुरू असणाऱ्या या रेशीम कोश उत्पादन प्रकल्पाविषयी त्यांनी सविस्तर अशी माहिती विशद केली. यानंतर कार्यशाळेला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री. विभुते यांनी रेशीम शेती प्रकल्प उभारणीमध्ये त्यांचा अनुभव, आजवरचा जीवन प्रवास आणि रेशीम शेतीमधील व्यावसायिक भविष्य याबाबत भाष्य केले.  चीन पाठोपाठ भारताने केलेली प्रगती याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी रेशीम शेतीविषयी असलेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना देखील त्यांनी उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे समाधान केले. यानंतर शेतकरी मनोगतामध्ये काटी येथील रेशीम शेती नुकतीच सुरू केलेले शेतकरी प्रदीप साळुंखे आणि उले येथील प्रगतशील महिला शेतकरी सौ.दुर्गा खरतमल यांनी लोकमंगल कृषी महाविद्यालय मार्फत आयोजित या रेशीम शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे कौतुक केले. भविष्यातील शेतकऱ्यांना असलेल्या संधी,महिलांना असणारे फायदे आणि कमी पाण्यावर चालणारी शेती अत्यावश्यक असल्याची या कार्यशाळेमुळे जाणीव झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतामध्ये आपले विचार मांडताना लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी सर्वप्रथम शेळगाव, सांगवी, काटी, ऊळे आणि तामलवाडी येथून कार्यशाळेकरीता आवररजून सदरील कार्यशाळेत एकूण ६७ शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यात मुख्यत्वे प्रगतशील महिला शेतकऱ्यांची  उल्लेखनीय उपस्थिती होती.कार्यशाळेचा शेवट कु.वैष्णवी घोडके हिने उपस्थितांचे  आभार मानून केला.यानंतर युनिट ला सर्वांनी भेट दिली व त्यांचे प्रश्न विचारताना विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले तसेच हा प्रकल्प फायदेशीर आहे असे मत व्यक्त केले त्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. 

Reactions

Post a Comment

0 Comments