Hot Posts

6/recent/ticker-posts

वाचन संस्कृतीमुळे मुलांची बौद्धिक भूक वाढेल- जुगदार

 वाचन संस्कृतीमुळे मुलांची बौद्धिक भूक वाढेल- जुगदार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वाचनामुळे माणसाचे आयुष्य समृद्ध होते. त्यामुळे लहानपणापासूनच वाचनाचे संस्कार होणे गरजेचे असून वाचन संस्कृतीमुळे मुलांची बौद्धिक भूक वाढण्यास मदत होईल असा विश्वास छत्रपती शिवाजी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जूगदार यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये वाचन संकल्प उपक्रमांतर्गत आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनपर मुख्याध्यापिका जुगदार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार हे होते. याप्रसंगी प्रा. डॉ. संतोष गवळी, प्रा.  डॉ. युवराज सुरवसे, प्रा. डॉ. अरुण सोनकांबळे, प्रा. डॉ. वाल्मिक किर्तीकर, प्रा. डॉ. अरुण मित्रगोत्री, प्रा. डॉ. नागेश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत प्रा. डॉ. राणी मोटे यांनी केले, प्रास्ताविक प्रा. डॉ. अभिमन्यू  ओहोळ यांनी केले.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. पवार यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना नियमितपणे वाचन करण्याचे आवाहन केले. ग्रंथ  प्रदर्शनास विद्यार्थ्यांची मोठ्या  प्रमाणात उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती घोडके, प्रियांका पवार, भानुदास घंधुरे, शहाजी जाधव, महेश ढेंगळे, केशव लोंढे, दत्ता भोसले, संतोष अलकुंटे, संजय थिटे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. अरुण सोनकांबळे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. संतोष गवळी यांनी मांडले.

Reactions

Post a Comment

0 Comments