Hot Posts

6/recent/ticker-posts

वैभव गोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तालुका संघटक पदी नियुक्ती

 वैभव गोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तालुका संघटक पदी नियुक्ती



माढा (कटूसत्य वृत्त):- उपळाई बु ता-माढा येथील सामाजिक व चिञपट क्षेञात काम करणारे वैभव शिवाजी गोरे यांची माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )पक्षाच्या तालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे.त्यांना माढा तालुक्याचे आमदार अभिजित आबा पाटील व तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा हस्ते नियुक्त पञ देण्यात आले.यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट प्रदेश प्रवक्ते  शरद गोरे यांच्या मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. यापुढे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे वैभव गोरे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य दिपक आबा देशमुख, मा.सरपंच दत्ता लवटे,उपसरपंच बसवराज आखाडे, शंभूराजे साठे,आबा साठे,ज्योतिताई कुलकर्णी,सोसायटीचे संचालक  सिताराम काका जाधव परमेश्वर शिंदे, संदीप सुळे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments