Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षण, आरोग्य व उद्योग याबाबतीत महिलांना साक्षर करणार- प्रा. मिनाक्षी जगदाळे

 शिक्षण, आरोग्य व उद्योग याबाबतीत महिलांना साक्षर करणार- प्रा. मिनाक्षी जगदाळे



अकलूज (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील महिला चूल आणि मूल यामध्ये अजूनही अडकलेल्या दिसून येतात त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड सातत्याने प्रयत्न करीत असून जिजाऊ  ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शिक्षण ,आरोग्य व उद्योग याबाबतीत प्रशिक्षण देऊन साक्षर करणार असल्याचे जिजाऊ ब्रिगेडच्या सोलापूर व सातारा विभागाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रा मीनाक्षी जगदाळे यांनी सांगितले

     जिजाऊ ब्रिगेडच्या सातारा व सोलापूर विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने त्यांचा अकलूज येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी माळशिरस तालुका सकल मराठा समाजाचे नेते माणिकराव मिसाळ, धनंजय माने साखळकर ,अण्णासाहेब शिंदे, बबनराव शेंडगे ,रणजीत कदम, सचिन गायकवाड ,दिगंबर मिसाळ ,सचिन पराडे ,अनिल कदम ,रणजीत गायकवाड, दत्ता गोरे ,शिवराम गायकवाड ,अमोल जगदाळे गणेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

   यावेळी पुढे बोलताना प्रा मीनाक्षी जगदाळे म्हणाले की ,सातारा व सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या गावागावांमध्ये शाखा काढून ग्रामीण भागातील गरजू व गरीब महिलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देऊन छोटे छोटे गृह उद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभा करणार असून यामुळे स्वतःच्या व कुटुंबाच्या विकासात महिलांचा हातभार लागणार आहे सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने सन्मान केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले यावेळी बबनराव शेंडगे, रणजीत कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक निनाद पाटील तर आभार धनंजय माने साखळकर यांनी मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments