अकलूज येथील रेशन ग्राहक कवेत तर दुकान चालक हवेत
अकलूज (विलास गायकवाड):- अकलूज येथील काही स्वस्त धान्य दुकानदार यांनी गेले दोन ते तीन महिन्या पासून स्वस्त धान्याचे वाटप केले नसल्याची चर्चा, काही ग्राहक दबक्या आवाजात करत असल्यामुळे, अकलूज येथील रेशन ग्राहक, दुकान चालकाच्या कवेत म्हणूनच दुकान चालक हवेत अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
अकलूज हे गाव निमशहरी म्हणून ओळखले जाते. या गावाने आशिया खंडात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. तसेच गावची लोकसंख्या ही जेम तेम आहे. सततची वाढती महागाई आणि रोजकाराची कमकरता, यामुळे स्वस्त धान्य दुकानाच्या आधारावर उदरनिर्वाह करणाऱ्या, गोरगरिबांची संख्याही जास्त आहे. अकलूज गावात कमीत कमी आठ नऊ स्वस्त धान्य दुकाने असून यातील काही स्वस्त धान्य दुकानदार यांनी,ग्राहकांना स्वस्त धान्याचे वाटप गेले दोन ते तीन महिन्या पासून केले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दुकानदार स्वस्त धान्याचे वाटप करत नाहीत ही वस्तुस्थिती समोर येणे ही गंभीर बाब आहे? अशी चर्चाही सध्याला अकलूज परिसरात सुरू आहे. ही बाब अत्यंत गंभीर जरी असले तरी स्वस्त धान्य दुकानदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे किंवा त्यांचे दप्तर तपासण्याची जबाबदारी पुरवठा विभागाची आहे. याकडे लक्ष केंद्रित करून,तात्काळ तहसीलदार तसेच पुरवठा विभाग यांनी अकलूज येथील स्वस्त धान्य दुकानांची सखोल चौकशी करावी करणे गरजेचे आहे.अशी मागणी ग्राहकातून होताना दिसत आहे.कारण स्वस्त धान्य दुकान यावर हजारों कुटुंब उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांच्या हक्काचे धान्य जाते कोठे याचा शोध घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.कारण स्वस्त धान्य दुकानदार यांचे आलिशान बंगले आणि बदलती जीवनशैली विचार करण्यास भाग पाडत असल्याचे, काही ग्राहक बोलून दाखवत आहेत.
चौकट
मिळालेल्या माहितीनुसार,अकलूज मध्ये सध्या काही लोक, नव्याने स्वस्त धान्य दुकान चालवत आहेत. यातील काहींची पार्श्वभूमी गुंडवृत्तीची होती आणि काहींनी जेलची हवा खाऊन अल्याचेही समजते आहे.
तर यातील पूर्वी, काही स्वस्त धान्य दुकान चालकच, काही स्वस्त धान्य दुकानदार यांना हप्ते मागत होते.त्यांना त्रास देत होते.अशा लोकांकडे स्वस्त धान्य दुकाने गेली कशी? असा प्रश्न समस्त जनतेला पडला आहे.
0 Comments