Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रशासनाने सर्वसामान्यांची कामे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्वरित मार्गी लावावीत- पालकमंत्री जयकुमार गोरे

 प्रशासनाने सर्वसामान्यांची कामे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्वरित मार्गी लावावीत -पालकमंत्री जयकुमार गोरे

 

सोलपुर, (कटूसत्य वृत्त):- शासनाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केलेल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची आहे. त्यामुळे या प्रशासकीय यंत्रणेने सर्वसामान्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा तसेच यंत्रणेकडे येणारी कामे त्वरित मार्गी लावावीत, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.


            नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सर्व विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आ. सर्वश्री राम सातपुते, रवींद्र राऊत, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.


            पालकमंत्री  गोरे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसात सात सुत्री कार्यक्रमाची उद्दिष्टपूर्तता करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व सर्व प्रशासकीय यंत्रणेने आपली जबाबदारी ओळखून कामे पूर्ण करावीत. या अंतर्गत सर्वसामान्यांना विविध सोयी सुविधा देण्याबरोबरच कार्यालयाची स्वच्छता करावी. तसेच ही स्वच्छता मोहीम राबवत असताना सर्वसामान्य नागरिकांना चांगली वागणूक देऊन त्यांची कामे त्वरित मार्गी लावण्याच्या दृष्टीने अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मनाची स्वच्छता ही केली पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments