Hot Posts

6/recent/ticker-posts

वाळू तस्करांची महिला प्रांताधिकाऱ्यांना दादागिरी

 वाळू तस्करांची महिला प्रांताधिकाऱ्यांना दादागिरी 


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- दबंग महिला प्रांत अधिकारी यांनी वाळू तस्करावर कारवाईचा बडगा उगारला असून अवैधपणे वाळू वाहतूक करणारा टिपर चार ब्रास वाळूसह वीस लाख,२८ हजाराचा मुद्देमाल जप्त करून तीन जणांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने खळबळ उडाली असून वाहने आडवी लावून कारवाई रोखण्याचा प्रयत्न व धक्का-बुक्की करणाऱ्यासह तीन वाळू तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

ही कारवाई २३ जानेवारी रोजी रात्री १२.३० ते १.४५ वा.सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर वरवडे शिवारात करण्यात आली. राज्याचे जलसंपदामंत्री डॉ.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टेंभुर्णीत एका खाजगी कार्यक्रमात वाळू तस्करी वरून खास शैलीत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाहून टिप्पणी केली होती.यामुळे प्रशासन वाळू तस्करावर काय कारवाई होणार याकडे लोकांचे लक्ष लागून राहीले होते.

कुर्डुवाडी येथील प्रांत अधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली तलाठी व इतर कर्मचारी यांचे पथक कारवाई करण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गावरून येत असताना एक टिपर जात असल्याचे पाहून संशयावरून त्यास थांबविले असता त्यामध्ये विनापरवाना उत्खनन करून आणलेली वाळू मिळून आली.त्याच्याकडे वाळूचे कोणतेही कागदपत्रे नसल्याने टिपर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पथक टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडे येत होते.यावेळी प्रांत अधिकारी यांच्या शासकीय वाहनास फॉर्च्यूनर व अल्कायझर या गाड्या आडव्या लावून त्यांना रोखण्याचा व कारवाईस अडथळा आणण्याचा दोघांनी प्रयत्न केला.तसेच प्रांत अधिकारी यांना आण्णा पाटील याने हाताने धक्का बुक्की केली आहे.

याबाबत आण्णा पाटील रा.शिराळ (टें) ता. माढा,आप्पा पराडे रा. बाभळगाव,ता.माळशिरास व टिपर चा चालक गणेश काशिद रा.परीतेवाडी ता.माढा सोलापूर या तीन जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.  याबाबत तलाठी प्रविण बोटे-(वय-३४) रा.कुर्डुवाडी यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोसई अजित मोरे हे करीत आहेत.

या गुन्ह्यामुळे आज दिवसभर टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या आवारात सर्व वाळूमाफेच्या गाड्यांची रांग  आरोपींना भेटायला लागली होती या मुळे हे पोलीस स्टेशन आहे का हे वाळू माफियाचा आड्डा आहे का? असे दिवसभर सर्वसामान्य नागरिकांतून बोलले जात होते.
Reactions

Post a Comment

0 Comments