प्रा. संतोष शेंडे यांना पीएचडी पदवी प्रदान
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालयातील कृषि विस्तार विभागाचे सहाय्यक प्राध्यापक संतोष शेंडे यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या 26 व्या दीक्षांत समारंभामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. हा दीक्षान्त समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन , कृषिमंत्री माणिकराव कोकाटे , जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित पार पडला
प्रा. शेंडे यांनी यांनी जागतिक बँक व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प या प्रकल्पाचा लाभार्थी शेतकऱ्यांवरती होणारा परिणाम या विषयावरती शोध प्रबंध सादर केला आहे. या शोध कार्यासाठी शासकीय कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राकेश अहिरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
त्यांच्या या यशाबद्दल श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी. वाय. यादव , उपाध्यक्ष नंदन जगदाळे सचिव पी. टी. पाटील सहसचिव ए .पी. देबडवार , खजिनदार जयकुमार शितोळे ,प्राचार्य पी. आर गलांडे व महाविद्यालयातील सर्व स्टाफ यांनी त्यांचे अभिनंदन केले.
0 Comments