Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा बारच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

 माढा बारच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण 

सोहळा उत्साहात संपन्न 


कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- माढा बार असोसिएशन सन २०२५-२६ साठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांना गुलाबपुष्प,प्रशस्तीपत्र देऊन मानाचा फेटा बांधुन सन्मानित करण्यात आले.व्यासपीठावर मुख्य न्यायाधीश अखिल जैन,न्यायाधीश योगेश आखरे,न्यायाधीश गणेश गांधे,न्यायाधीश वैभवी क्षीरसागर, नुतन अध्यक्ष ॲड.दयानंद पाटील,उपाध्यक्ष ॲड.प्रशांत पाठक, सचिव ॲड.रघुनंदन लोंढे,सहसचिव ॲड.रोहित क्षीरसागर, खजिनदार ॲड.सरस्वती ताटे,ग्रंथालय सचिव ॲड.धुळदेव मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम न्यायाधीश अखिल जैन,ॲड.आनंद कुलकर्णी ॲड.संतोष कानडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर राजमाने तर आभार रणजित पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल धोत्रे सत्यवान सुर्वे श्रीकृष्ण भोसले गजानन काळे निशिकांत राजमाने सचिन गायकवाड पुरुषोत्तम क्षीरसागर शहाबाज शेख संदीप नगरे दिग्विजय पाटील महेश गुंजाळ सागर काळे आदीनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments