Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी प्रशालेत सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

 नेताजी प्रशालेत सुभाषचंद्र बोस जयंती साजरी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी  सुभाषचंद्र बोस प्रशालेत सुभाषचंद्र बोस यांची १२८ वी जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम मुख्याध्यापक रविशंकर कुंभार ,पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, कस्तुरबा शिक्षण शास्त्र महाविद्यालयचे प्रा. लक्ष्मी कुरापाटी, ज्येष्ठ शिक्षक राजकुमार मरगुरे,काशिनाथ माळगोंडे , विजयालक्ष्मी माळवदकर आदींच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रशालेत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या लहान गटातून तनुजा गजानन चिरमाडे ,जान्हवी विष्णूदेव कांबळे, अखिल श्रीनिवास जरबंडी या विद्यार्थ्यांनी प्रथम , द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविले. मोठ्या गटातून प्रतीक्षा हंचाटे,वैष्णवी पेंडम, आरती मामडयाल या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक पटकाविले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, साने गुरुजी लिखित कथामला पुस्तक,पेन बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार म्हणाले , तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा' असा नारा देत  सुभाषबाबूनी तरुणांना एकत्र करुन आझाद हिंद सेनेची स्थापन केले.इंग्रजांना प्रखर विरोध करत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले तर  शिवकुमार शिरुर यांनी आभार मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments