फेब्रुवारी मध्ये केळी 33 रुपयाच्या पुढे जाण्याचा अंदाज - किरण चव्हाण
केळीला येणार सोन्याचे दिवस
माढा (कटूसत्य वृत्त):- डिसेंबर जानेवारीपासून सुरू असलेल्या केळी दराच्या घसरणीमुळे केळी उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला होता उत्पादन खर्च लागवड रोपांच्या किमती झालेली वाढ तसेच शासनाने केलेल्या रासायनिक खतांच्या किमतीतील वाढ शेणखताच्या किमतीतही टेलरला झालेली वाढ वाढलेले मजुरीचे दर केळीवर असलेला खोडकीड करपा कुंकूम मोजक व्हायरस सीएमव्ही सारख्या रोगाने फवारणी खर्चात झालेली वाढ हा खर्च पाहता केळी दर हा कायमस्वरूपी हमीभाव 24 रुपये 30 पैसे असायला हवा. असे मत केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण यांनी व्यक्त केले.
डिसेंबर पासून केळीचे दर हे थंडीत चिलीग मुळे कमी होऊन 7 ते 8 रुपये कटिंग केला गेला त्यामुळे उत्पादन आणि खर्च यामध्ये तफावत निर्माण होत गेली त्यामुळे केळी लागवडी कर शेतकरी दुरावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली परंतु आज शिरपूर तालुक्यामध्ये 2501/- भाव मिळाला असून सण पाहता महाशिवरात्री रमजान तसेच येणारा कुंभमेळ्यात केळीची प्रचंड मागणी वाढली आहे. तसेच देशातून निर्यात ही चांगल्या प्रमाणात होत असून पुढेही निर्यात चालू राहणार असुन केळी ही 33 रु च्या पुढे भाव शेतकऱ्यांना मिळेल असा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला.
यावेळी केळी उत्पादक शेतकरी संघाचे राज्य समन्वयक सचिन कोरडे उपस्थित होते शेतकऱ्यांनी चौकशी करूनच मालाची कटिंग करावी असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.
0 Comments