Hot Posts

6/recent/ticker-posts

गतवर्षी विसावा पूर्ण केलेल्या नंदीध्वजधारकांचा सत्कार

गतवर्षी विसावा पूर्ण केलेल्या नंदीध्वजधारकांचा सत्कार




 सोलापूर, (कटुसत्य वृत्त ):-

ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर यात्रेत गेल्यावर्षी नंदीध्वजांचा विसावा पूर्ण केलेल्या
नंदीध्वजधारकांचा श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीच्यावतीने बुधवारी सत्कार करण्यात आला.
श्री सिध्दरामेश्वर यात्रेमध्ये मानाच्या सात नंदीध्वजांची मिरवणूक काढली जाते. भक्ती आणि श्रध्देच्या जोरावर नंदीध्वजधारक नंदीध्वजांचा विसावा पूर्ण करतात. यासाठी यात्रेपूर्वी महिनाभर नंदीध्वजधारक सराव करतात. यात्रा आता अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असून त्यानिमित्त देवस्थान पंचकमिटीच्या कार्यालयात यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते यांच्या हस्ते गतवर्षी नंदीध्वजांचा विसावा पूर्ण केलेल्या नंदीध्वजधारकांचा फेटा, उपरणे आणि प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये यश वाले, सागर देवकुळे, आदेश मस्के, गणेश अक्कलकोटे, अनिरुध्द पाटील, स्वप्निल पवार, मंजुनाथ स्वामी, श्रीधर माळी, आकाश पाटील, महांतेश गोरे, चिन्मय भोगडे, शिवशंकर कुर्ले, बसवराज गुब्ब्याड, नित्यानंद स्वामी आदींचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी देवस्थान पंचकमिटीचे विश्वस्त नीलकंठप्पा कोनापुरे, बाळासाहेब भोगडे, पशुपतीनाथ माशाळ, विलास कारभारी, आप्पासाहेब कळके, रतन रिक्के, चिदानंद वनारोटे, सुरेश म्हेत्रे- कुंभार, नितीन उपासे तसेच प्रसाद कुमठेकर यांच्यासह नंदीध्वजांचे मास्तर व भाविक उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब भोगडे म्हणाले, नंदीध्वज पेलण्याचा आनंद हा वेगळाच असतो. तरुणांना नंदीध्वज पेलण्याचे प्रोत्साहन मिळावे यासाठी सत्कार करत असल्याचे त्यांनी सांगितले.


Reactions

Post a Comment

0 Comments