Hot Posts

6/recent/ticker-posts

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये संघमित्रा विद्यालय प्रथम

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये संघमित्रा विद्यालय प्रथम




 कुर्डूवाडी (कटुसत्य वृत्त ): रोपळे ता. माढा येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये संघमित्रा माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वैभवी संजय गायकवाड हिला प्रथम क्रमांक मिळाला. नैसर्गिक शेती या प्रयोगास तालुक्यातून प्रथम क्रमांक देण्यात आला. कुर्डूवाडी पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी शोभा लोंढे,सुभाष राऊत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन तिला व मार्गदर्शक शिक्षका सीमा खारवणे यांना सन्मानित करण्यात आले.याबरोबरच त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. या विज्ञान प्रदर्शनामध्ये 225 पेक्षा जास्त प्रयोग सहभागी झाले होते.प्रशालेच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव- समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, सर्व संचालक मंडळ, गटशिक्षणाधिकारी विकास यादव, नपा प्रशासन अधिकारी शाहू सतपाल,केंद्रप्रमुख लक्ष्मण करंडे, मुख्याध्यापक अविनाश भालशंकर तसेच संस्थेतील सर्व शिक्षक स्टाफ यांनी यशस्वी शिक्षिका विद्यार्थिनीचे अभिनंदन व कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.संघमित्रा प्रशालेच्या यशस्वी कामगिरीमुळे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments