Hot Posts

6/recent/ticker-posts

एसटी चालक, वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता

 एसटी चालक, वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता



सोलापूर (कटुसत्य वृत्त) :-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्यावतीने एसटी बसेसच्या चालक-वाहकांसाठी या वर्षात नवी योजना कार्यान्वित केली जाणार आहे. १ ते ३१ जानेवारी या कालावधीदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर उत्पनावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना राबविण्यात येणार असल्याचे सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी सांगितले.
या योजनेमध्ये निव्वळ वाहतूक उत्पन्न जानेवारी २०२४ च्या उत्पन्नावर आधारित उद्दिष्ट काढण्यात येणार आहे. सदर उद्दिष्ट चालक-वाहक यांनी पूर्ण करून त्यापेक्षा जास्त वाढीव उत्पन्न एसटी महामंडळाची नववर्षात नवी योजना आणले तर वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम ही प्रोत्साहन भत्ता म्हणून चालक वाहक यांना समप्रमाणात तात्काळ रोखीने अदा करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाच्या चालक- वाहकांना आपल्या कामात अधिक प्रोत्साहन मिळावे. त्यासोबत
अर्थसाहाय्य व्हावे, यासाठी एस.टी. महामंडळाने नवी योजना कार्यान्वित केली आहे.
हंगामी काळ नसताना एसटी बसेसना प्रवाशांची गर्दी असते. अशावेळी एसटी महामंडळाच्यावतीने
या योजनेअंतर्गत चालक- वाहकांना प्रोत्साहन मिळावे आणि प्रवाशांचे भारमान वाढावे, यासाठी उपयोजनात्मक योजना महामंडळ दरवर्षी कार्यान्वित करते. तरी सोलापूर विभागातील जास्तीत जास्त चालक-वाहकांनी उद्दिष्टापेक्षा जास्त उत्पन्न आणावे आणि जास्तीत जास्त प्रोत्साहन भत्ता मिळवावा, असे आवाहन विभाग नियंत्रक, अमोल गोंजारी यांनी केले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments