डॉ. जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा
बार्शी (कटुसत्य वृत्त) :-
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त बुध्दिबळ स्पर्धा संत तुकाराम हॉल बार्शी येथे घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजक वखारिया विद्यालय उपळे हे होते. या स्पर्धा प्राथमिक गट, माध्यमिक गट, खुला गट मुले व खुला गट मुली अशा चार गटांत पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये ४०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. प्राथमिक व माध्यमिक गटातून पाच क्रमांक काढण्यात आले. यामध्ये संस्थांतर्गत प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक सान्वी दत्तात्रय गोरे (महाराष्ट्र विद्यालय), द्वितीय क्रमांक प्रज्वल बारंगुळे (महात्मा फुले विद्यामंदिर), तृतीय क्रमांक श्रीशैल्य घाडगे (महाराष्ट्र विद्यालय), चौथा क्रमांक मधुरा क्षीरसागर ( जिजामाता विद्यामंदिर, बार्शी), पाचवा क्रमांक विराज जिरंगे (महाराष्ट्र विद्यालय), माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक प्रसन्न जगदाळे (महाराष्ट्र विद्यालय), द्वितीय क्रमांक वेदांत खोसे (महाराष्ट्र विद्यालय), तृतीय क्रमांक यज्ञेश जाधव (महाराष्ट्र विद्यालय), चौथा क्रमांक शुभम कदम (महाराष्ट्र विद्यालय), पाचवा क्रमांक अजय वैद्य (महाराष्ट्र विद्यालय). खुला गट मुले प्रथम क्रमांक प्रसन्न जगदाळे (महाराष्ट्र विद्यालय), द्वितीय क्रमांक वेद आगरकर (सुलाखे इंग्लिश मीडियम), खुला गट मुली प्रथम क्रमांक अनन्या उलभगत (फिनिक्स पोदार लर्न स्कूल) द्वितीय क्रमांक संपदा बोळे (श्री शिवाजी महाविद्यालय), तृतीय क्रमांक शिवकन्या बकाल यांनी पटकावला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेचे सचिव पी. टी. पाटील व संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी संस्थेचे सदस्य व स्पर्धा प्रमुख बी.के. भालके. मुख्याध्यापक दयानंद रेवडकर, नामदेव महाले, अतुल नलगे व अविनाश जाधव उपस्थित होते. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम स्पर्धा संपल्यानंतर स्पर्धा प्रमुख बी. के. भालके व संयोजन समिती मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी वखारिया विद्यालयाचे नामदेव महाले, स्नेहा निंबाळकर, यांनी परिश्रम घेतले. तसेच पंच म्हणून काम पाहिले. या यशाबद्दल सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, सचिव पी.टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य यांनी कौतुक केले.
0 Comments