पंढरपूर अर्बन बँकेतर्फे कै.देशभक्त बाबुरावजी जोशी व्याख्यानमालेचे आयोजन
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- दि पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि., पंढरपूर तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे सहकार सप्ताहाचे औचित्य साधुन कै.देशभक्त बाबुराव जोशी व्याख्यानामालेेचे आयोजन दि.17 ते 19 जानेवारी 2025 पर्यंत बँकेचे खवा बाजार, नवीपेठ, पंढरपूर येथील कर्मयोगी सभागृहात करणेत आल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी दिली.
याप्रसंगी माहिती देताना ते म्हणाले, पंढरपूर अर्बन बँक यावर्षी 113 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचे विविध प्रश्नांवर विचार मंथन होवुन समाज प्रबोधन व्हावे, यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करणेत आले आहे. सदर व्याख्यानमालेचा शुभारंभ शुक्रवार दि.17 जानेवारी 2025 रोजी सायं.6.00 वाजता बँकेचे मार्गदर्शक कुटूंबप्रमुख मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते करणेत येणार आहे.
सदर व्याख्यानमालेमध्ये पहिले पुष्प प्रसिध्द शिवव्याख्याते श्री.प्रशांत देशमुख, हातनोळी चौक, जि.रायगड यांचे “उठ युवका जागा हो, शिवचरित्राचा तू धागा हो...”, दुसरे पुष्प प्रा.सौ.विभा काळे, मुंबई यांचे “कथाकथन” तर तिसरे पुष्प प्रसिध्द साहित्यिक डॉ.मिलींद जोशी, कार्याध्यक्ष महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांचे “जीवनातील विनोदाचे स्थान” याप्रमाणे व्याख्यान आयोजित केले आहे. सदर व्याख्यानमाला कर्मयोगी सभागृह, खवा बाजार, नवीपेठ, पंढरपूर येथे दररोज सांयकाळी 6.00 वाजता आयोजित केला आहे. या व्याख्यानमालेस रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
याप्रसंगी बँकेचे व्हा.चेअरमन माधुरीताई जोशी, संचालक रजनीश कवठेकर, हरिष ताठे, पांडुरंग घंटी, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, राजाराम परिचारक, अमित मांगले, अनंत कटप, गणेश शिंगण, ऋषिकेश उत्पात, व्यंकटेश कौलवार, मनोज सुरवसे, अनिल अभंगराव, गजेंद्र माने, तज्ञ संचालक अतुल कौलवार, प्रभुलिंग भिंगे, उदय उत्पात, सोमनाथ होरणे, शुभम लाड, संचालिका संगिताताई पाटील व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे आदी मान्यवर उपस्थित होते.
: चौकट :
शुक्रवार दि.17 जानेवारी 2025 रोजी
पहिले पुष्प-प्रसिध्द शिवव्याख्याते श्री.प्रशांत देशमुख, ठाणे यांचे “उठ युवका जागा हो, शिवचरित्राचा तू धागा हो...”,
शनिवार दि.18 जानेवारी 2025 रोजी
दुसरे पुष्प-प्रा.सौ.विभा काळे, मुंबई यांचे विषय-“कथाकथन”
व रविवार दि.19 जानेवारी 2025 रोजी
तिसरे पुष्प-प्रसिध्द साहित्यिक डॉ.मिलींद जोशी यांचे विषय-“जीवनातील विनोदाचे स्थान”
0 Comments