शालेय राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत मोहोळच्या नागनाथ विद्यालयास तिहेरी मुकूट
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- शालेय राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व केलेल्या नागनाथ विद्यालय व ज्युनि. कॉलेज मोहोळच्या 17 वर्षे मुले,मुली व 19 वर्षे मुलीच्या संघाने अनुक्रमे 17वर्षे मुले द्वितीय क्रमांक, 17 वर्षे मुली तृतीय क्रमांक व 19 वर्षे मुली द्वितीय क्रमांक पटकावून तिहेरी मुकुट संपादन केले.
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुलात 12 ते 14 जाने. 25 दरम्यान स्पर्धा पार पडली.
यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक संभाजी चव्हाण, समीर शेख, आबा गावडे, संतोष सीताप व श्रीमती सुनिता घाडगे यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश पवार साहेब व विद्यालयाचे मुख्याध्यापक बशीर बागवान उपप्राचार्य प्रकाश शिंदे आदींनी अभिनंदन केले.
चौकट
या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विजय मिळवला
17 वर्षे मुली
अंजली मळगे, कार्तिकी गरगडे, श्रावणी खताळ, संचिता माळी, मनस्वी अलदर, जिया पठाण, राणी लोमटे, राजनंदनी राठोड, श्रुतिका होडगे,
19 वर्षे मुली
पूजा राऊत, वैष्णवी आदलिंगे, सह्याद्री आवारे, सायली वालीकर, महेक शेख, साक्षी माळी, सिद्धी घाटगे, वैष्णवी काळे, हर्षदा गजघाटे, वैभवी सिताप,
17 वर्ष मुले
गुरु गायकवाड, सुयश मुसळे, श्रीहरी साठे, योगीराज ढोणे, आयान तांबोळी, सक्षम कोळी, समर्थ महामुनी, विश्वजीत पवार, अनिस बागवान.
0 Comments