शोकाकुल वातावरणात सोलापूरकरांनी महेश कोठेंना दिला अखेरचा निरोप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 16, 2025

शोकाकुल वातावरणात सोलापूरकरांनी महेश कोठेंना दिला अखेरचा निरोप

 शोकाकुल वातावरणात सोलापूरकरांनी महेश कोठेंना दिला अखेरचा निरोप




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे यांचे निधन झाले आहे. या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक एक्झिट मानली जात आहे.
 महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते, त्या नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडी मुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे हे महापालिकेचे नगरसेवक राहिले आहेत तसेच पुतणे देवेंद्र कोठे हे भारतीय जनता पार्टी कडून शहर मध्ये चे आमदार आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मधून महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवली होती परंतु त्यांना अपयश आले यापूर्वीही त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. आमदार होण्याचे स्वप्न तसेच त्यांनी सुरू केलेल्या आयटी पार्कचे स्वप्न अधुरेच राहिले असे म्हणावे लागेल. आयटी पार्क साठी आता कोण पुढाकार घेणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सोलापूर महापालिकेमध्ये त्यांनी महापौर पद भूषवले. महापालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते. महानगरपालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचे अचानक निधन झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत असून अनेकांना या बातमीने धक्का बसला आहे.

दरम्यान लखनौहुन विशेष एअर एंबुलन्सने त्यांचं पार्थिव सोलापुरातील संभाजी शिंदे शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेऊन मुरारजी पेठेतील “राधाश्री” निवासस्थानी आणण्यात आले.

लाडक्या अण्णांच्या अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी;
राधाश्री निवासस्थानावर माजी महापौर महेश कोठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages