आवनी चौगुले धावण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- तामशीद वाडी तालुका माळशिरस येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी अवनी अनिल चौगुले हिने माढा येथे घेण्यात आलेल्या सोलापूर जिल्हा परिषद आयोजित जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत २०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल तामशीदवाडी तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कांबळे तसेच शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ यांनी अवनी चौगुले हिचे अभिनंदन व कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments