टेंभुर्णी शहरातील जुन्या महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण काम निकृष्ठ,भाजपच्या वतीने भजन आंदोलन
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी शहरातील महामार्गाची निकृष्ट दर्जाची व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने मंगळवारी सुरू केलेले भजन आंदोलन मागण्याची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन महामार्ग प्राधिकारणचे कनिष्ठ अभियंता मोहसीन शेख यांनी दिल्याने तात्पुरते स्थगित करण्यात आले.
टेंभुर्णी शहरातील जुन्या महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण काम निकृष्ठ झाले असून ठीक-ठिकाणी खराब रस्ते,पुलाचे अर्धवट राहिलेले धोकादायक कठडे यासह रस्त्याची कामे अपूर्ण असल्याने रस्ता हस्तांतरित करण्यास टेंभुर्णी सरपंच सुरजा बोबडे यांनी तीव्र विरोध केला होता.डिझाईन इस्टिमेट प्रमाणे काम केले गेले नाही तसेच शहरातील रस्ते या महामार्गास योग्य पद्धतीने जोडले गेले नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.तसेच अपघात होत आहेत.यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने वेळोवेळी निवेदने देऊनही या कामाबाबत रस्ते महामार्ग प्राधिकरण कडून व निर्ढावलेल्या ठेकेदाराकडून त्यास कसलाही प्रतिसाद मिळत नव्हता.यामुळेच तीन-चार दिवसांपूर्वी भजन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे,सरपंच सुरजा बोबडे यांनी सर्व मागण्या पूर्ण केल्याशिवाय ग्रामपंचायत नो ऑब्जेक्शन देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली.यावेळी पोनि दीपक पाटील यांनी ही मध्यस्थी केली.
माजी उपसभापती विक्रमसिंह शिंदे,शिवाजी पाटील,निवृत्ती तांबवे, लाला मोरे,रामभाऊ शिंदे,राजाराम थोरात,जयवंत पोळ,नागनाथ वाघे, बाळासो ढगे,सचिन होदाडे,गौतम कांबळे,तुकाराम डोके,हरिभाऊ सटाले,सोमनाथ ताबे,राम पवार,पंडित देशमुख,बंकट देशमुख,श्रीकांत लोंढे,नागेश बोबडे,शांतीलाल कुटे,रामदास खराडे,स्वराली बोबडे,रत्नमाला शिंदे,भाजपच्या शहराध्यक्ष अनिता लोंढे,उर्मिला बारबोले,सुवर्णा देशमुख,आशा निमसे,नागेश कल्याणी,दमन सपाटे यांच्यासह महिला,पुरुष शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments