कृतिशील मुख्याध्यापक व प्राचार्यांचा डी. एस. कमळे गुरुजी
कम्प्युटर इन्स्टिट्यूट मंद्रूपच्या वतीने सन्मान
मंद्रूप(कटूसत्यवृत्त):- डी. एस. कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने कृतिशील मुख्याध्यापक व प्राचार्य पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने पुरस्कारप्राप्त लोकसेवा विद्यामंदिर, मंद्रूपचे प्राचार्य बसवराज कुमठेकर, माध्यमिक आश्रम शाळा, बसवनगरचे मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे, आणि संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर मोरे यांचा सन्मान करण्यात आला.
हा सत्कार डी. एस. कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक अभिजीत जवळकोटे, सोमशंकर जवळकोटे, व अविनाश जवळकोटे यांच्या हस्ते संपन्न झाला.कार्यक्रमात मंद्रूप मठाचे वेदमूर्ती शिवानंद हिरेमठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व मठपती सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी, आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने हजर होते.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षणक्षेत्रातील योगदान व भविष्यातील योजना याविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.हा सत्कार समारंभ प्रेरणादायी ठरला असून, शिक्षणक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मान्यवरांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपक्रम डी. एस. कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूटने राबवून सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श घालून दिला आहे.
0 Comments