प्रजासत्ताक दिनानिमित्त सद्भावना तिरंगा केंद्राचा आज शुभारंभ
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- प्रजासत्ताक दिनानिमित्त दि. 24 ते 26 जानेवारी 2025 रोजी सद्भावना तिरंगा केंद्र सुरू राहणार आहे, अशी माहिती सद्भावना सेवा दलाचे दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील हॉटेल सिटी पार्कच्या मागे असलेल्या तिरंगा बंगला येथे शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी या सद्भावना तिरंगा केंद्राचा शुभारंभ होणार आहे. या ठिकाणी साडेतीन ते चार फुटाची फायबरची भारत मातेची मूर्ती उपलब्ध आहे. तसेच तिरंगा ध्वज, अशोक स्तंभ, तिरंगा टी-शर्ट यासह विविध तिरंगा वस्तूसह मिठाई उपलब्ध राहणार आहे. रविवार दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता अमेरिकेतील अभियंता दिलीप गांधी यांच्यासोबत वार्तालाप कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, दि. 28 व 30 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध आश्रम शाळा आणि कॉलनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिठाईवाटप कार्यक्रम अभियंता दिलीप गांधी यांच्या हस्ते होणार आहे.
या पत्रकार परिषदेस ध्रुवेश गांधी, रोशन शेख, सोना गांधी, स्मृती गांधी, स्नेहा गांधी, रूपा पारेख, नारायण छाबरीया, प्रकाश लोढा, राकेश मालू , गणेश खेडकर आदी उपस्थित होते.
0 Comments