प्रादेशिक परिवहन कार्यालय, आरटीओ विभाग तर्फे
वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक यांचा सन्मान
अकोला (कटूसत्य वृत्त):-नागपूर मुंबई.. महामार्ग क्रमांक 54 वरील. होणाऱ्या अपघाता संदर्भात जनजागृती त्याचबरोबर महामार्गावरील अपघातग्रस्तांना मदत कार्य राबवणे विशेष कामगिरी करत अनेक सामान्य नागरिकांना मदत पोहचवून जीवनदान दिल्याबद्दल प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला मोटर वाहन विभाग रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मोटार वाहन कायद्याचे नियम हेल्मेट संदर्भात जनजागृती करण्यात आली अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक महामार्गावर नेहमीच मदत कार्य राबवत राहते या पथकाच्या कार्याची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला येथे आज कार्यक्रमात मुख्य आरटीओ अधिकारी रवींद्र भुयार, डेप्युटी आरटीओ हेमंत खराबे, ,मोटर वाहन निरीक्षक संदीप तुरकरे, मनोज शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाला देवदूत म्हणून सन्मानित करण्यात आले पथकाच्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना हेल्मेट पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पथकाचे योगेश विजयकर यांनी उपस्थित नागरिकांना पथका संदर्भात माहिती सांगितली त्याचबरोबर आपले अनुभव सादर केले आणि हेल्मेटचे फायदे सुद्धा यावेळी त्यांनी सांगितले यावेळी वीर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाचे अध्यक्ष विजय माल्टे, योगेश विजयकर, शाहबाज शहा, पवन आढुळकर, उपस्थित होते
0 Comments