लाल बावटा बांधकाम कामगार युनियन मार्फत मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने लाल बावटा बांधकाम कामगार युनियनने पुढाकार घेऊन मोफत रक्त तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.यामध्ये सर्व नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीयांनी लाभ घेतल्याची माहिती युनियनचे कॉ.अमित मंचले यांनी दिली.
लाल बावटा बांधकाम कामगार युनियन सिटू सोलापूर व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.15/1/2025 रोजी तपासणी ते उपचार आरोग्य योजना मोफत रक्त तपासणी शिबिर मसिहा चौक मोदी येथे आयोजित करण्यात आले.या शिबिरामध्ये 224 बांधकाम कामगारांनी व त्यांच्या परिवारासह तपासणी व मोफत औधोपचाराचा लाभ घेतले.या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कॉ. एम एच शेख प्रा. अब्राहम कुमार, कॉ शंकर म्हेत्रे ॲड. अनिल वासम आदींची उपस्थिती होती.
सक्रीय सहभाग व विशेष सहकार्याबद्दल युनियन यांच्या वतीने अमित मंचले यांनी आरोग्य विभागाच्या सौ.संध्या जाधव व त्यांचे वृंद यांचे मनपूर्वक आभार मानले.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी अजय भंडारे, सिमोन पोगुल गौतम जगले, रवि भंडारे ,मसिहा तरूण मंडळाचे सर्व सदस्य व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments