नातेपुते ग्रामीण रुग्णालयात महिला बाबत अडचणी, आरोग्य मंत्री यांना निवेदन
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्याचे कार्यकारी अध्यक्ष अक्षय भांड यांना नातेपुते व परिसरातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय येथे महिला रुग्ण यांची तेथील नेमलेले डॉक्टर योग्य प्रकारे दखल घेत नाहीत महिला रुग्णांची प्रसूती बाबत अनेक अडचणी येतात या विषयी याविषयी तक्रारी केल्या होत्या. त्याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, मंत्री प्रकाश आबिटकर यांना अक्षय भांड यांनी नातेपुते ग्रामीण रुग्णालयात होत असणाऱ्या महिला रुग्णांची हेळसांड याविषयी निवेदन दिले.सदर देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हणण्यात आले आहे की, गेली अनेक वर्षापासून नातेपुते ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलांच्या प्रसूतीबाबत अनेक अडचणी येत आहेत. अपुरी यंत्रणा, डॉक्टरांकडून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांकडे जाणूनबुजून दुर्लक्षित करणे, कोणत्याही आजाराबाबत रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर तात्पुरते उपचार केले जातात व रूग्णांच्या उपचाराबाबत टाळाटाळ केली जाते, डॉक्टरांची वाट बघत पेशंटला तासंतास बसावे लागते, रात्रीच्या वेळेस एखादा अति संवेदनशील पेशंट आला तर डॉक्टर उपलब्ध नसतात, डॉक्टरांची व स्टाफची पेशंटसोबत वर्तवणूक बरोबर नसते अशी ओरड नागरिकांकमधून येत आहे. या भोंगळ कारभाराबाबत सिव्हिल सर्जन यांच्या कानावर घालून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तरी त्वरित नातेपुते ग्रामीण रुग्णालयाची कसुन चौकशी व्हावी व जे दोषी आढळतील त्यांचे कायमस्वरूपी निलंबन करावे व आपण या विषयामध्ये स्वतः लक्ष घालावे असे विनंती आशयाचे निवेदन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अक्षय भांड यांनी भेट घेऊन निवेदन दिले. सदर देण्यात आलेल्या निवेदनाची गंभीर दखल घेऊन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नातेपुते ग्रामीण रुग्णालय महिला रुग्ण यांची प्रसूती व इतर आजाराबाबत होत असलेला निष्काळजीपणा याविषयी सोलापूर सिव्हिल सर्जन यांना आदेश पत्र काढून नातेपुते ग्रामीण रुग्णालयात वरील होत असलेल्या तक्रारी निवेदनाबाबत चौकशी करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन यांना देण्यात आले आहेत.
0 Comments