Hot Posts

6/recent/ticker-posts

शंभूराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

 शंभूराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा



बार्शी (कटूसत्य वृत्त):- छावा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमासाठी बार्शी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, पी एस आय उमाकांत कुंजीर, बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, दैनिक संचार चे उपसंपादक सचिन वायकुळे, पत्रकार संजय आबा बारबोले,मा.नगरसेवक मदन गव्हाणे व संतोष बारंगुळे, वृक्ष संवर्धन समिती अध्यक्ष उमेश काळे, जाणीव फाऊंडेशन चे मामासाहेब हवालदार, बापूसाहेब कदम, विजय राऊत हे उपस्थित होते,
यावेळी  मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला सनई चौघड्याच्या सुरात दुग्ध व जलाभिषेक करण्यात आला, तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल व्यक्ती व संघटनेचा सन्मान करण्यात आला त्यात ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयर्न मॅन स्पर्धेत बार्शीची आणि भारत देशाची सरशी करणारे आयर्नमॅन महावीर कदम तसेच गोमातेची मनोभावे सेवा करणारे गोमातेची काळजी घेणारे गोसेवक किशोर अकोस्कर तसेच बार्शीतील समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या त्रिमूर्ती प्रतिष्ठान यांच्या संपूर्ण टीम चा देखील सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रम स्थळी मसाला दुधाचे  वाटप याप्रसंगी करण्यात आले, मामासाहेब हावलदार आणि बाळासाहेब चव्हाण यांनी बोलताना छावा प्रतिष्ठान च्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी सर्व छावा प्रतिष्ठान चे पदाधिकारी यांच्यासह सर्व शंभू भक्त यांनी परिश्रम घेतला.

Reactions

Post a Comment

0 Comments