Hot Posts

6/recent/ticker-posts

शक्तिपीठ महामार्ग

शक्तिपीठ महामार्ग


भूसंपादनासाठी होणार मोजणी; सर्व्हेसाठी ३.९६ कोटी शुल्क

सोलापूर, (कटुसत्य वृत्त):-
नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला या पाच तालुक्यांतून जाणार असून भूसंपादनाच्या अगोदरच शेतकऱ्यांकडून विरोध सुरू झाला आहे. शासनाच्या आदेशानुसार संपादित होणाऱ्या जमिनीची मोजणी केली जाणार असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सर्व्हेसाठी ३ कोटी ९६ लाख रुपये शुल्क भरावेत, असे भूसंपादन विभागाने कळविले आहे. नागपूर - गोवा या द्रुतगती महामार्गाने शक्तिपीठ महामार्ग जोडला जाणार असून त्यामुळे पर्यटनाला मोठी संधी मिळणार आहे. मात्र, कोणाचीही मागणी नसताना हा महामार्ग केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी या महामार्गात जातील, त्यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांकडून मोठा विरोध सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून तीव्र विरोध झाला. निवडणुकीत फटका बसेल या भीतीने या प्रकल्पाला महायुती सरकारने स्थगिती दिली होती. मात्र, राज्यात पुन्हा सत्तेवर आलेल्या हायुती
सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांतून हा महामार्ग जाणार आहे. शेतकरी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास तयार नाहीत. हा प्रकल्प रद्द करावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र, शासनाचा आदेश असल्यामुळे संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोजणीसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा महामार्ग तयार केला जाणार असून मोजणीसाठी महामंडळाने ३ कोटी ९६ लाख रुपये शुल्क भरावेत, असे त्यांना कळविले असल्याचे भूसंपादन विभागाचे अधिकारी संतोष देशमुख यांनी सांगितले.. 

Reactions

Post a Comment

0 Comments