रयत क्रांती संघटनेकडून नुतन मुख्यमंत्र्यांच्या सत्काराबरोबर शेतकर्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन..
टेंभूर्णी(कटूसत्य वृत्त):- -महाराष्ट् र राज्याचे नुतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आला.रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकार्यांचे शिष्ठमंडळाने मुंबई येथील सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.त्यांच्या सत्काराबरोबरच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या हिवाळी अधिवेशनात पूर्ण व्हाव्यात अशा आशयाचे निवेदन राज्य प्रवक्ते प्रा. सुहास पाटील व रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत यांच्यावतीने देण्यात आले.या निवेदनामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय हिवाळी अधिवेशनात घेण्यात यावा. साखरेला प्रति किलो ४०/- रुपये हमीभाव देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित ठिबक संच अनुदान व फळबाग लागवड अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंजूर केलेले प्रति लिटर ७/- रुपये अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे. तसेच दुधाला ३/५ व ८.५ फॅट व एस एन एफ साठी प्रति लिटर 4डरुपये हमीभाव देण्यात यावा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रथम सत्रात मंजूर करण्यात यावी. आदि शेतकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना देण्यात आले. या शिष्ठमंडळामध्ये राज्यकार्याध्यक्ष दीपक भोसले, माजी प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ. एन. डी. चौगुले, सोलापूर युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल वेदपाठक, सुनील पाटील, अमोल पाटील, आदिनाथ कपाळे आदिजन ऊपस्थित होते.
0 Comments