नेताजी शिक्षण संस्थेत प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री ष. ब्र. तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त नीलम नगर येथील नेताजी शिक्षण संस्थेत प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली.
प्रथम श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले , प्राचार्य रविशंकर कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, विजयालक्ष्मी कुंभार,वैशाली गुजर,प्रियांका खिलारे,संगीता कुडक्याल उपस्थित होते.
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक, इंग्लिश मिडीयम स्कूल, माध्यमिक शाळेत तसेच विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या अंतिम स्पर्धेसाठी निवडक ५० विद्यार्थ्यांची निवड करुन स्पर्धा पार पडल्या.डॉ.जयंत नारळीकर गट (तिसरी,चौथी) प्रज्वल गोब्बूर- प्रथम ,श्रावणी नागठाण- द्वितीय, डॉ.जगदीशचन्द्र बोस गट- (पाचवी,सहावी) ओमकार बिंगी-प्रथम, तुलशी तवटम- द्वितीय ,डॉ.होमी भाभा गट (सातवी,आठवी) ऐश्वर्या बाबा- प्रथम ,ईरेश अक्का- द्वितीय. डॉ. विक्रम साराभाई गट (नववी,दहावी)योगीराज तोरणे- प्रथम,दिलीप प्यारकी- द्वितीय क्रमांक पटकाविले.
परीक्षक म्हणून हणमंत कुरे , भारती पाटील,विश्वनाथ तंबाके, संतोष प्रचंडे, शितल पाटील, विश्वराध्य मठपती, प्रशांत बत्तुल, शिवानंद पुजारी जयश्री बिराजदार, योगिता नरोणे आदींनी काम पाहिले.
0 Comments