विद्या निकेतन प्रशालेत भरला चिमुकल्यांचा आनंद बाजार
मसले चौधरी (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील विद्या निकेतन प्रशालेत चिमुकल्यांचा आनंद बाजार भरवण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दीपक चव्हाण हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे चेअरमन गुणवंत पोटरे, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक सिरसट, पांडुरंग सहकारी पतसंस्थेचे मॅनेजर सुरेश लामकाने उपस्थित होते.
याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच दीपक चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आनंद बाजाराचे उदघाटन गुणवंत पोटरे, दीपक सिरसट यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले .
प्रशालेचे अध्यक्ष मा. जनार्दन (बापू )कादे, साई होंडा बार्शीचे मालक मा. युवराज कादे यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दप्तराविना शाळा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक विकासा बरोबर व्यवसायिक शिक्षणातून त्यांच्यात व्यवहार ज्ञान कौशल्य स्वानुभवातून विकसित व्हावे हा उदात्त हेतू साध्य करण्यासाठी "चिमुकल्यांचा आनंद बाजार" भरवण्यात आला होता.भरवण्यात आलेल्या आनंद बाजारात पालेभाज्या, फळभाज्या, फ्रुट शाॅप, स्टेशनरी शॉप किराणा शॉप,खेळणी टॉय शॉप, चहा टी शॉप,अन्नपूर्णा मिठाई शॉप,स्नॅक शॉप, चायनीज सेंटर अशा नानाविध पदार्थांची विक्री करण्यात आली.
या बाजारात विद्यार्थ्यांनी दुपट्टीने नफा झाल्याचे सांगितले. या विद्यार्थी पाखरांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यात व्यवसायिक कौशल्य प्राप्त होऊन धाडस निर्माण व्हावे तसेच त्त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी,प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र जाधव, नागनाथ धुमाळ, शिवानंद बोधले, रविकांत साबळे, सौ. कांचन पवार, गजानन पाटील, सौ. अंजना पोटरे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी दशरथ कदम सर, मुलाणी सर, बारबोले सर, राऊत जाधव सर, सौ. संगीता गावडे मॅडम, दिपाली साखरे मॅडम, सौ. पाटील मॅडम, सौ. गुंड मॅडम,मुकुंद चव्हाण, प्रदीप सिरसट, सचिन पोटरे,बालाजी गलांडे, प्रा. डॉ. शिवशंकर राऊत, ज्ञानेश्वर नागटिळक अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद बोधले सरांनी केले,तर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व विद्यार्थी ग्राहकांचे आभार रविकांत साबळे सरांनी मानले..
0 Comments