नेताजी शिक्षण संस्थेत ६९४ विद्यार्थ्यांचा रांगोळी स्पर्धेत सहभाग
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री ष.ब्र. तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेत आयोजित रांगोळी स्पर्धेत ६९४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले.
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली १२० विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुनिता पवार, कल्पना आकळवाडी,भारती नरोळे, वैशाली मोरे, रुपाली देसाई, रुपाली इंगळे आदींनी परिश्रम घेतले.नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये १५० विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संगिता कुडक्याल, अश्विनी गंगुल, राजश्री कोळी, तेजस्विनी जोगीपेटकर, प्रियांका खिलारे आदींनी परिश्रम घेतले. नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल येथे आयोजित रांगोळी स्पर्धेचे उदघाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, विश्वाराध्य मठपती, शिवानंद पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.या रांगोळी स्पर्धेत १०१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वैशाली इंडे, मीनाक्षी वांगीकर,उमादेवी कुंभार, जयश्री बिराजदार, भाग्यश्री महाजन, विजयालक्ष्मी माळवदकर आदींनी परिश्रम घेतले.
विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत २७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले.या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उज्ज्वला भांड, वंदना तेली, पूजा जत्ती, रुपाली जळकोटे, वैशाली गुजर, शीतल चमके, सुजाता फुलारी आदींनी परिश्रम घेतले.राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेत आयोजित रांगोळी स्पर्धेत ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले.संगिता नरगिडे, शितल पाटील, दिपक नरोणे आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments