नेताजी शिक्षण संकुलात उत्तर सोलापूर तालुक्याच्या विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात उदघाटन
१३२ विज्ञान साहित्यांचे प्रदर्शन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी शिक्षण संकुलात उत्तर सोलापूर तालुक्याचे ५२ व्या विज्ञान प्रदर्शनाचे थाटात उदघाटन झाले.या विज्ञान प्रदर्शनात १३२ विज्ञान साहित्यांचे मांडणी करण्यात आले आहे.
प्रथम नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार , शेळगीचे केंद्रप्रमुख विकास पाटील, डोणगाव केंद्रप्रमुख कोळी, बाळे केंद्रप्रमुख निंबर्गी, देगाव केंद्रप्रमुख यावगल,नानज केंद्रप्रमुख चौधरी,प्राचार्य रविशंकर कुंभार , सेवानिवृत्त प्राचार्य रेवणसिद्ध रोडगीकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुंल्ले ,विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संजय जवंजाळ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे , मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार आदी मान्यवरांच्या हस्ते नाविन्यपूर्ण व आधुनिक अशा पद्धतीने अध्यात्म व विज्ञान यांचा संयोग साधण्यासाठी रिमोट कंट्रोलद्वारे दीपप्रज्वलन करुन उदघाटन करण्यात आले. यावेळी सिद्धेश्वर निंबर्गी म्हणाले , विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून घेऊन वैज्ञानिक संकल्पना विज्ञान प्रदर्शनात मांडणे काळाची गरज आहे. बाबासाहेब पाटील ,बापूराव जमादार , संजय जवंजाळ आदी मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले ,आज आजच्या युगात वैज्ञानिक अभ्यास असणे काळाची गरज आहे.विज्ञान हे दुसऱ्यांच्या विध्वंसासाठी नसून आपण चांगले शास्त्रज्ञ बनून देशाची सेवा करण्यासाठी असल्याचे सांगितले.या विज्ञान प्रदर्शनात रेन वॉटर हार्वेस्टिंग ,पाणी स्वच्छ करण्याचे उपकरण, सेंद्रिय शेती, स्मार्ट अँड सेफ्टी ड्रायव्हिंग ब्लाइंड टर्न , ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट अशा प्राथमिक विद्यार्थ्यांचे ७६ विद्यार्थी व माध्यमिक विभाग विभागाचे ४६ विद्यार्थी, शिक्षक विभागामध्ये नऊ शिक्षक व एक प्रयोगशाळा परिचर आदींनी विज्ञानाचे विविध प्रयोग साहित्य मांडले आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवकुमार शिरुर, रेवणसिद्ध दसले, अशोक पाटील ,चंद्रकुमार कुंभार, प्रशांत बत्तुल ,जगदेव गवसने, भारती नरोळे, सुनीता पवार, कल्पना आकळवाडी, कांचन कंदीकटला, राजश्री कोळी, रोहिणी नंदर्गी, जगदेवी रोडगे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल पाटील यांनी केले.
0 Comments