भारतीय स्टेट बँक आणि एसबीआय म्युच्युअल फंड यांच्या बेकायदेशीर
व्यवसाय व ग्राहक सेवा मधील त्रुटींबाबत
निषेध व्यक्त करीत धरणे आंदोलन करण्यात आले
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- भारतीय मित्र परिवार तर्फे स्टेट बैंक व एसबीआय म्युच्युअल फंडचे ग्राहक या नात्याने अनुभवलेले स्टेट बँकेचे व एसबीआय म्युच्युअल फंड यांचे बेकायदेशीर व्यवसाय, फसवणुकींचे प्रकार आणि ग्राहक सेवामधील त्रुटींच्या विरोधात धरणे करण्यात आंदोलन आले
भारतीय स्टेट बैंक, ट्रेझरी शाखा, सोलापूर येथील शाखाधिकारी सौ. सरस्वती उंबरजे यांनी व इतर अधिकाऱ्यांनी ७८ वर्षांच्या एका खातेदारसह इतर गुंतवणूकदारांना दिशाभूल करून, संभ्रमीत करून प्रायव्हेट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला प्रेरित करून नुकसान करण्याचे प्रयत्न केल्याचे आहे. याविषयी दिनांक २७/११/२०२४ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन केले असता, त्याचा प्रतिसाद काहीच नसल्याने पुन्हा धरणे आंदोलन करण्यात आले
सगळा प्रकार भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी ऑनलाईन OTP द्वारे केल्याने गुंतवणूकदारालात्यावेळेस काहीच माहिती मिळाली नव्हती . अर्धवट माहिती देऊन, प्रत्यक्षात एसबीआय लाइफ इन्शुरन्स खाजगी, एसबीआय म्युच्युअल फंड व भारतीय स्टेट बँक हे वेगवेगळे असताना दोन्ही एकच असल्याचे सांगितले.
तसेच अॅक्सिस बँक मध्ये फक्त कमिशन, प्रमोशन किंवा विदेश यात्रा मिळविण्यासाठी मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे एजंट किंवा अॅक्सिस बँकेचे नसलेल्या दुसऱ्या कंपनीच्या एजंटला किंवा इतर कर्मचान्यांना बसवून अॅक्सिस बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवून इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक वळवत (ट्रान्सफर) करीत गुंतवणूकदारांची फसवणूक करीत असल्याची तक्रार समोर येत आहे.
एच डी एफ सी बँकेचे एक महिला कर्मचारीने ३ कोटी रुपयांचे अफरातफर केल्याचे ताजे उदाहरण आहे. या व अशा अनेक प्रकारांमध्ये बँकेच्या कर्मचारी अधिकारी खातेदार / गुंतवणूकदारांचे विश्वास संपादन करून फसवणूक करीत आहे.
यापूर्वी सोलापूर शहर व जिल्ह्यातून अनेक नागरिकांना फसवलेले अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय स्टेट बैंक आणि एसबीआय च्या नावाने चालणाऱ्या कंपन्या व बँका गुंतवणूकदारांची दिशाभूल करून जर फसवणूक करीत असेल तर सोलापूर शहरातील नागरिकांचे हित, आर्थिक सुरक्षितता पूर्णपणे ढासळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून या फसवेगिरी करणाऱ्या बँकांच्या विरुद्ध बँकांच्या सादर्म्य नावे असलेल्या कंपन्या विरुद्ध निषेध व्यक्त करीत धरणे आंदोलन करण्यात आले. गुंतवणूकदारांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी, गुंतवणूकदारांच्या हितासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी लढा देण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना आर्थिक विषयी जागृती निर्माण करण्यासाठी पुन्हा धरणे आंदोलन करण्यात आले . या धरणे आंदोलनाविषयी सदर बझार पोलीस स्टेशन येथून परवानगी मिळाली होती सामान्य जनता व त्यांचा पैसा सुरक्षित राहावा म्हणून या आंदोलना मध्ये सर्वानी सहभाग नोंदवला
यावेळी वरुण अंकम, लक्ष्मण मिठ्ठा, विजयकुमार अंकम, लक्ष्मण चंदनकेरी, अंबादास चिंताकिंदी,
शिवाजी कुडकयल, अशोक द्यावंपल्ली, जगदीश नल्ला, यल्लप्पा मादगुंडी, लक्ष्मीपती पामु आदी या आंदोलनास उपस्थित होते
0 Comments