आ .अभिजीत पाटील यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजाचे दर्शन घेतले.
माढा (कटूसत्य वृत्त):-माढ्याचे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर आज पहाटे किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजाचे दर्शन घेतले.किल्ले रायगडावर जाऊन महाराजाचे दर्शन घेणारे अभिजीत पाटील राज्यातील पहिले आमदार ठरले आहेत.शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा घेऊन रयतेस प्रथम प्राधान्य देऊन त्यांचा आणी मतदासंघाच्या विकासाचे व्हीजन साधले जाणार आहे.
मतदार संघाचे नाव असलेल्या माढा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारुनच किल्ले रायगडावर अभिवादनाला येणार असल्याची प्रतिक्रिया अभिजीत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
0 Comments