Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी शिक्षण संकुलात बुधवारपासून विविध कार्यक्रम

 नेताजी शिक्षण संकुलात बुधवारपासून विविध कार्यक्रम




सोलापूर(कटूसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री ष.ब्र.तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने बुधवार दि. ११ ते २० डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
बुधवार दि.११ डिसेंबर रोजी नेताजी प्रशाला निलम नगर व राजराजेश्वरी प्रशाला विनायक नगर येथे रक्तदान शिबिर, गुरुवार दि.१२ डिसेंबर रोजी चित्रकला व रंगभरण स्पर्धा, शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी रांगोळी स्पर्धा, शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा, रविवार दि.१५ डिसेंबर रोजी वक्तृत्व व श्लोक पाठांतर स्पर्धा, बुधवार दि.१८ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर,  मंगळवार दि. १७ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमालेस प्रारंभ, अविनाश भारती (संभाजीनगर ) हे 'भारतीय संस्कृती व आजची तरुणाई' या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी संतोष परंडवाल (मुंबई) हे 'श्रमसंस्कार आणि पालकत्व' या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. गुरुवार दि. १९ डिसेंबर रोजी बार्शीचे विशाल गरड हे 'नाते संस्कार आणि समाज' या विषयावर तिसरे व शेवटचे पुष्प गुंफणार आहेत. शुक्रवार दि.२० डिसेंबर रोजी संस्थेच्या अशोक चौकातील कार्यालयात सकाळी सात वाजता पूज्य महास्वामीजींच्या पादुकांस रुद्राभिषेक व सहस्त्र बिल्वार्चन, तदनंतर अशोक चौक ते  नीलम नगर पर्यंत पूज्य महास्वामीजींच्या पादुकांची व प्रतिमांचे हजारो भक्तगणांसह सवाद्य मिरवणूक निघणार आहे. ११.३० वाजता नीलम नगर येथील नेताजी शिक्षण संकुलात मिरवणुकीची सांगता होणार आहे.यावेळी भक्तांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.सायंकाळी सहा वाजता बक्षीस वितरण समारंभ, सात वाजता मराठी, हिंदी, कन्नड या भावभक्ती गीतांचा कार्यक्रम, रात्री दहा वाजून पाच मिनिटाला श्री तपोरत्नं आत्मज्योतीचे दीपप्रज्वलन व श्रद्धांजली समर्पण कार्यक्रम होणार आहे. तरी सदभक्तांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून गुरुकृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments