अभिजित पाटील यांचा मराठा सेवा संघातर्फे सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माढा विधानसभेचे नवनिर्वाचित आ.अभिजित पाटील यांचा मराठा सेवा संघ माढा तालुक्याच्यावतीने पुष्पहार घालून व शिवधर्म गाथा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सह संघटक दिनेश जगदाळे, विभागीय अध्यक्ष
किरण घाडगे, जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, पंढरपूर विभाग मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक
तात्यासाहेब पाटील, माढा तालुकाध्यक्ष नीलेश देशमुख,सचिव शिवाजीराव गवळी
उपस्थित होते. यावेळी आ. अभिजित पाटील यांनी आपण संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा
संघाच्या विचारधारेचे असून मराठा सेवा संघाला नेहमीच माझे सहकार्य राहील, असे
सांगितले.
0 Comments