महापालिकेच्यावतीने २ ते १३ डिसेंबरपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 5, 2024

महापालिकेच्यावतीने २ ते १३ डिसेंबरपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम

 महापालिकेच्यावतीने २ ते १३ डिसेंबरपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  महापालिकेच्यावतीने २ ते १३ डिसेंबरपर्यंत विशेष स्वच्छता
मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेत शहरातील ७९ मुख्य रस्ते स्वच्छ करण्यात येणार आहेत. एकूण ४३७ कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.बुधवारी, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक ते रेल्वे स्टेशन, डीआरएम ऑफिस ते डफरीन चौक, सात रस्ता ते पत्रकार भवन, विजापूर नाका ते पनाश अपार्टमेंट, बनशंकरी चौक जुळे सोलापूर ते एचएसआर पाणी टाकी, गवळी वस्ती आकाशवाणी रोड ते लोकमंगल स्वच्छता मोहिमेत सातत्य हवे महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी भेट देऊन स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. उपस्थित असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छता मोहिमेत सातत्य ठेवण्यात यावे, अशा सूचनाही दिल्या. या मोहिमेसाठी सामाजिक संस्था, संघटनांनीही पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.  हॉस्पिटल, दयानंद कॉलेज ते धरमकाटा चौक, धरमकाटा चौक ते रूपाभवानी चौक हे रस्ते स्वच्छ करण्यात आले. रस्त्यावरील धूळ काढणे, झाडांच्या फांद्या छाटणी, दोन्ही बाजूकडील फूटपाथची स्वच्छता, कचरा काढणे अशी स्वच्छतेची
कामे करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेसाठी आठ मुख्य आरोग्य निरीक्षक,
४९ आरोग्य निरीक्षक, ३८० स्वच्छता कर्मचारी, जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन
वाहने, पाण्याचे टँकर अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. ही मोहीम १३
डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून नियंत्रण अधिकारी यांच्या अधिपत्याखाली रोज सकाळी
सात ते दहा या वेळेत शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, संदीप कारंजे,उपायुक्त आशिप लोकरे, तैमूर
मुलाणी, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, कृष्णा पाटील, मुख्य
सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, अनिल चराटे, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, महेश क्षीरसागर, सुनीता हिबारे, हिदायत मुजावर, सतीश एकबोटे, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, सहायक अभियंता विद्युत महादेव इंगळे, उपअभियंता तपन डंके, किशोर सातपुते, सहायक अभियंता अविनाश वाघमारे, मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंडगुळे, उद्यान अधिकारी किरण जगदाळे, स्वप्निल सोलनकर यावेळी उपस्थित होते. या स्वच्छता मोहिमेमध्ये रखुमाई महिला बचत गटाच्या अध्यक्ष सोनाली कसबे,सचिव सुनीता जाधव, आशा लक्ष्मण डोलारे,भाग्यश्री अविनाश खंदारे,मीनाक्षी किशोर जाधव यांनी सहभाग नोंदवला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages