Hot Posts

6/recent/ticker-posts

भरघोस निधीतून मोहोळ शहराचा कायापालट करणार-आ.राजू खरे

 भरघोस निधीतून मोहोळ शहराचा कायापालट करणार-आ.राजू खरे




पोखरापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहराने दादागिरी, दडपशाही झुगारून मला ८० टक्के मतदान दिले. त्यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. दुष्काळात स्वखर्चातून १७ टँकरच्या माध्यमातून मोफत वाटलेल्या पाण्याची मोहोळकरांनी जाणीव ठेवली, असे सांगत मोहोळने आमदारकीची संधी दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात जास्तीत जास्त निधी मोहोळ शहराच्या विकासासाठी आणून सोलापूर जिल्ह्यातील एक सुंदर शहर म्हणून मोहोळची ओळख निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन मोहोळचे नूतन आ.राजू खरे यांनी केले. मोहोळ शहरातील नाईकवाडीनगर येथे हिंदू-मुस्लिम बांधवांच्यावतीने नूतन आमदार राजू खरे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. खरे बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, माजी नगरसेवक सत्यवान देशमुख, राजू रसाळ, विक्रम सितारा देशमुख, चंद्रकांत गोडसे, सर्फराज सय्यद आदी उपस्थित होते. आ.खरे पुढे म्हणाले की, माजी आमदारांनी मोहोळ शहराला राजकीय द्वेषातून भकास केले.लोकप्रतिनिधींना जनतेने त्या कंटाळून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली. सर्वच राजकीय पक्षांतील नेतेमंडळींसोबत माझे मैत्रीचे संबंध असल्यामुळे मोहोळच्या मूलभूत सुविधांसाठी शासन दरबारी वजन वापरून जास्तीतजे नापास झालेत त्यांच्याकडून कसली मदत? यापुढील काळात मोहोळ मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार राजू खरे यांना कसलीही मदत लागली तर ती मदत करण्यासाठी तयार असल्याचे माजी आ. यशवंत माने यांनी माध्यमांना सांगितले होते. या प्रश्नाबाबत आ. खरे यांना विचारले असता ते म्हणाले की, जे नापास झाले त्यांच्याकडून कसली मदतीची अपेक्षा. विकासाचे खोटे आकडे सांगितले म्हणूनच जनतेने ३० हजार मतांनी पराभव केला. त्यांच्या मदतीची काही आवश्यकता नाही.जास्त विकास निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उमेश पाटील म्हणाले की, लोकप्रतिनिधी नसतानाही राजू खरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोहोळ मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली. त्यामुळेच मतदारांनी त्यांना पसंती दिली. अनगरचे मताधिक्य तोडून काढण्याचे काम स्वाभिमानी मोहोळकरांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्फराज सय्यद यांनी केले. कार्यक्रमाला मोठी गर्दी होती.

Reactions

Post a Comment

0 Comments