*सोमवारी नेताजी शाळेत उत्तर सोलापूर तालुक्याचे विज्ञान प्रदर्शन*
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर तालुक्याचे ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सोमवार दि.९ व १० डिसेंबर रोजी आकाशवाणी रोडवरील निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात आयोजित करण्यात आली आहे.
सोमवार दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होणार असून दि.१० डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.तरी तालुक्यातील मुख्याध्यापकांनी दि.७ डिसेंबर पर्यंत https://forms.gle/ Hd435nXp3KQZdwRM7या लिंकवर माहिती भरुन नाव नोंदणी करावी. ऑफलाइन फॉर्म भरता येणार नाही. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान, सामाजिक, पर्यावरणास अनुकूल या मुख्य विषयाला अनुसरुन अन्न,आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि दळणवळण, नैसर्गिक शेती,आपत्ती व्यवस्थापन,गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार,कचरा व्यवस्थापन, संसाधन व्यवस्थापन या विषयापैकी एका विषयावर आधारित विद्यार्थी : उच्च प्राथमिक स्तर (इ. ६ वी ते ८ वी पर्यंत) पहिले तीन वस्तू / प्रतिकृती, माध्यमिक स्तर (इ. ९ वी ते १२ वी पर्यंत) पहिले तीन वस्तू प्रतिकृती,शिक्षक: प्राथमिक स्तर (इ. १ ली ते ८ वी पर्यंत) १ शैक्षणिक साहित्य, माध्यमिक स्तर (इ. ९ वी ते १२ वी पर्यंत) १ शैक्षणिक साहित्य,प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर: एक वैज्ञानिक प्रतिकृती या प्रमाणे निवडलेल्या वस्तू जिल्हा स्तरावर पाठविण्यात येणार आहे.
तालुकास्तरावर निवड करताना सृजनशील व कल्पनाशक्ती (२० गुण),वस्तूची मौलिकता व वैज्ञानिक, गणितीय नाविन्यता (१५ गुण),वैज्ञानिक विचारतत्व पागम -प्रणाली, दृष्टीकोन (१५ गुण),तांत्रिक कौशल्य, कारीगरी, शिल्पकौशल्य (१५ गुण), समाजासाठी उपयोगिता, मापनियता (१५ गुण), अल्पखर्चिक हस्तवाह्यता, टिकाऊपणा (१० गुण), सादरीकरणाचे पैलू जसे दिग्दर्शन, स्पष्टीकरण आणि प्रदर्शन (१५ गुण) असे एकूण १०० गुणांची निकष ठरविण्यात आले आहे. तरी तालुक्यातील सर्व मान्यता प्राप्त प्रार्थामक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर, शिक्षकांनी सहभाग घेण्याची व नाव नोंदणी करण्याचे आवाहन पंचायत समिती उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांनी आवाहन केले आहे.संपर्क विज्ञान साधन व्यक्ती चंद्रकांत वाघमारे (९४०५१२८१७४)
0 Comments