औसा तालुक्यायाच्या शिरपेचात आनखीन एक मानाचा तुरा उटी ( बु )
ग्रामपंचायतची राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी निवड ,,,
औसा (कटूसत्य वृत्त):- जे जे नव ते ते उटी गावला हव संकल्पनेतुन विकासाची बुलेट ट्रेन चालु असलेल्या उटी बु गावच्या शिरपेचात राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये ग्रामपंचायत उटी बु चा देशाचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.
लातुर जिल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) बाळासाहेब वाघ,औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे , विस्तार अधिकारी औसा बालाजी तेलंग, बालाजी पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल पंचायत अवॉर्ड हा केंद्र सरकार स्तरावर हा पुरस्कार उटी बु गावला जाहीर केला आहे.
औसा तालुक्यातील उटी बु हे गाव स्मार्ट व्हीलेज मनुन जिल्यातच नव्हे तर राज्यात नावलौकीक असलेल गाव अशी गावची ओळख आहे ,उटी गावात विकासात्मक धोरण आखुन ग्रामपंचायतच्या माध्यमातुन गावात १००% पक्के रस्ते ,गावात दहा ठीकाणी गरम पाण्याची सोय,जे ग्रामस्थ वेळेवर घरपट्टी व नळपट्टी भरतात अशा लोकांसाठी मोफत पीठाची गीरणी उपल्बद्ध करण्यात आली असुन ,गावातील ग्रामस्थांच्या निरोगी आरौग्यासाठी गावात पाणी फिल्टर बसवण्यात आले आहेत ,ग्रामपंचायत उत्पन्न वाढीसाठी दुकान गाळे उभारणी करण्यात आले आहेत ,गावातील लहान लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत संगणक कक्षाची उभारणी करण्यात आली आहे अशा अनेक विकासाभिमुक व लोकोपयौगी सोयीसुविधा ग्रामपंचायत माध्यमातुन राबविण्यात आल्याच पहायला मीळत आहे ,या सर्व सोयीसुविधा व गावात विकास कामे झाल्याने राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी उटी बु ग्रामपंचायतची निवड झाली असुन हा पुरस्कार देशाचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मान होणार आहे यावेळी उटीचे माजी सरपंच ॲड भालचंद्र पाटील ,सह सरपंच वैशाली कांबळे,उपसरपंच रफीक शेख,कर्तव्य दक्ष ग्रामपंचायत अधिकारी महेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यावर सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ...
0 Comments