माती परीक्षण ही काळाची गरज- संतोष कोयले
बार्शी (कटूसत्य वृत्त):- रासायनिक खतांचा अति प्रमाणात वापरामुळे जमिनीमधील सुपीकता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे माती मध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांचे प्रमाण तपासून योग्य प्रमाणात रासायनिक खतांचा व जैविक खतांचा वापर करणे हे आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन बार्शी तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी व्यक्त केले. बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय बार्शी, व कृषी विभाग बार्शी महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयामध्ये जागतिक मृदा संधारण दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. व्यासपीठावर सीताफळ संशोधक व प्रगतशील शेतकरी नवनाथ कसपटे, विक्रम साळवी तसेच गणेश पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्राचार्य पी. आर. गलांडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच डॉ. शेंडे एस. एस. यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि डॉ. एम. एस. बर्गे यांनी आभार व्यक्त केले.
0 Comments