Hot Posts

6/recent/ticker-posts

सिद्धेश्वर वुमेन्समध्ये प्लेसमेंट ड्राइव्ह लक्ष्मी हायड्रॉलिक्सचा विद्यार्थिनींसाठी उपक्रम

 सिद्धेश्वर वुमेन्समध्ये प्लेसमेंट ड्राइव्ह लक्ष्मी हायड्रॉलिक्सचा विद्यार्थिनींसाठी उपक्रम




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-येथील लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा. लि(एल. एच. पी)
व श्री सिध्देश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने प्लेसमेंट ड्राइव्हचे
आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींना कोअर इंडस्ट्रीमधील संधी मिळावी, या उद्देशाने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्युत अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थिनींसाठी ही ड्राइव्ह आयोजित करण्यात आली होती. या प्री-प्लेसमेंट टॉकच्या सुरुवातीला एलएचपीचे एच. आर.भरत वेदपाठक यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून एलएचपीच्या यशस्वी वाटचालीबद्दल व तेथील कार्यपध्दतीबद्दल माहिती दिली.याप्रसंगी एल. एच. पी. चे,व्ही. संपत, धैर्यशील दळवे, प्रभाकर पवार,मृणाल दळवी, संदीप म्हेत्रे उपस्थित होते.तसेच महाविद्यलयातील माजी विद्यार्थिनी व एलएचपी येथे संशोधन विभागात कार्यरत असणाऱ्या प्रेमल चिगनी व महानंदा पुकाळे आदी उपस्थित होत्या.प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राचार्य डॉ. तुकाराम चव्हाण यांनी केला व एल. एच. पी. चे मॅनेजिंग डायरेक्टर व गव्हर्निंग बॉडी मेंबर शरद ठाकरे यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या मार्गदर्शन, दरदृष्टी व कुशल नेतृत्वाखाली महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.आतापर्यंत माजी विद्यार्थिनी विविध नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असून त्यांची यशस्वी वाटचाल चालू आहे. शिस्तीत तयार झालेल्या या विद्यार्थिनीनींमुळे महाविद्यालयाला नावलौकिक प्राप्त झाले असून याचाच परिणाम म्हणून यंदाच्या वर्षीसुद्धा बहुराष्ट्रीय व नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस ड्राइव्हमध्ये वाढ झाली आहे.नियुक्ती पूर्व मार्गदर्शन व चर्चा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्षाच्या वैष्णवी चव्हाण हिने केले. या कार्यक्रमाचे समन्वय अक्षय गाजरे व प्रा. योगिनाथ कलशेट्टी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. ज्ञानेश्वर वाघमोडे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


Reactions

Post a Comment

0 Comments