.अंभोरा शेत शिवारात विहिरीत पडले नील गाईचे पिल्ले.
रेस्क्यू ऑपरेशन करून दिले जीवदान....!
अकोला (कटूसत्यवृत्त):-मुर्तीजापुर तहसील अंतर्गत अंभोरा येथील शेत शिवारात रितेश शंकरराव गोडसे यांच्या गट नंबर 136 मधील चाळीस फूट खोल विहीरीत पडले . या विहिरीत दोन नील गाईचे दोन पाडसे विहिरीत अंदाजे रात्री 12 वाजता पडले. रेस्क्यू टीम मध्ये बाळ काळणे सर्पतज्ञ व मानद , किसन जगताप , वनपाल पी पी सावळे , यशपाल इंगोले , आला सिंग राठोड, वन कर्मचारी अक्षय खंडारे, प्रदीप खडे, तुषार आवारे गावातील वन्य रक्षक प्रेमी बहुसंख्य उपस्थित होते. शेतकरी रितेश गोडसे यांनी मीडिया प्रतिनिधी धनराज सपकाळ , शब्बीर , डॉक्टर अर्जुन अंमझरे संपर्क करून वनविभागाच्या वरिष्ठ थोरात यांच्याशी संपर्क करून अकोल्यावरून रेस्क्यू टीम बोलावून तातडीने या वन्य प्राण्यांचे प्राण वाचविले. त्याबद्दल वन्य प्राणी प्रेमी यांनी वन विभागाचे आभार मानले. वन विभागाने तीन तालुक्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्याकरता एकच वाहन उपलब्ध आहे . त्यामुळे वन्य प्राण्या ंचा प्राण वाचवण्यासाठी काही ठिकाणी वेळ लागत असल्याने वन्य प्राण्यांचे जीव सुद्धा जाऊ शकतो . असे नाकारता येत नाही. शासनाने या तीन तालुक्यासाठी नवीन वाहनाची व्यवस्था करण्यात यावी . या निमित्ताने वन्यप्राणी प्रेमी यांनी मागणी केली आहे . नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेले युवा कर्तव्यदक्ष मंत्री नामदार. गणेश नाईक हे लक्ष देतील का.....? असा प्रश्न वन प्रेमी यांच्यामध्ये चर्चेचाला उधान आले आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना तार कंपाउंड देण्याची या निमित्ताने शेतकऱ्यांची केली मागणी आहे.
0 Comments