Hot Posts

6/recent/ticker-posts

मालवाहू ट्रक पलटी घेतला पेट, सुदैवाने प्राणहानी टळली ....! मुर्तिजापूर अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात .

  मालवाहू ट्रक पलटी घेतला पेट, सुदैवाने प्राणहानी टळली ....!

मुर्तिजापूर अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात

अकोला (कटूसत्य वृत्त):-   राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53वरील हेंडज फाट्याजवळ नागपूर कडे जाणारा मालवाहू ट्रक अचानक रस्त्यावरील डिव्हायडर  वर आदळल्याने रस्त्यावर पलटी झाला नंतर पेट घेतल्याने ट्रक मधील कपड्याच्या गाठी, हार्डवेअर, मेटिंन , चे समान अस्त व्यस्त पसरले तर काही माल ट्रकने पेट घेतल्याने बेचिराख झल्याची घटना रात्री 8वाजे दरम्यान घडली 

   प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक W B 95/4061हा गुजरातहुन कलकत्त्या  कडे हार्डवेअर चां माल नेत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53वरील हेंडज फाट्याजवळ रस्त्यावर असलेल्या डिव्हायडर  ला धडक दिल्याने पलटी होऊन पेट घेतल्याचे लक्षात येताच चालक व क्लिनर यांना उडी टाकून जीव वाचविले मात्र चालक घटना स्थळावरून  पसार झाला ट्रक मध्ये आग लागल्याने  ट्रक मधील हार्डवेअर अर्ध्या पेक्षा  जास्त  माल आगीत भस्मसात झाला सुदैवाने प्राणहानी टळली 

   घटना घडली असता काही अंतरावर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रणजित खेडकर, चंदन वानखेडे हेड पोलिस कॉन्स्टेबल दीपक कानडे, ज्ञानेश्वर रडके, सुदाम धुळगुंडे हे तिकडेच जात असता तात्काळ घटनेचे गांभीर्य पाहता नगर पालिका च्या अग्निशमन दलास पाचारण करताच अग्निशमन दलाचे चावरे, रवींद्र जवंजल, अब्दुल आसिफ, फायरमन तिलक टाक, अब्दुल सलीम यांनी पेटलेला ट्रक विझविण्याचे अथक प्रयत्न करुन आग आटोक्यात आणल्याने  मोठी दुर्घटना टळली. 

Reactions

Post a Comment

0 Comments