विद्यार्थ्यांनी फुलवला भाजीपाल्यांचा मळा !
बार्शी (कटूसत्य वृत्त):- कर्मबीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रामध्ये भाजीपाला व गहु लागवड केली आहे. सध्य- स्थितीत मेथी, पालक, कोथींबीर यांची अतिशय चांगली वाढ झालेली आहे. मेथीची चार ते पाच दिवसांमध्ये भाजी काढण्यायोग्य होईल. सदर लागवड व मशागत ही पुर्णपणे विद्यार्थ्यांनी स्वतः केलेली आहे व नियमित पाणी देणे, देखरेख करणे ही कामे पुर्णतः विद्यार्थ्याकडुन प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. संतोष शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली जातात.
सदर प्रक्षेत्राला शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार (बापू) शितोळे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य ,गलांडे पी. आर., प्रा. बोनगे, प्रा. बर्गे व श्री मोरे टी. एन. आदी उपस्थित होते.
0 Comments