Hot Posts

6/recent/ticker-posts

परितेच्या अभिनव स्कूलचा उपक्रम गावातील बँक, पोस्ट व प्राचीन ग्राममंदिराला क्षेत्रभेट

 परितेच्या अभिनव स्कूलचा उपक्रम गावातील बँक, पोस्ट व प्राचीन ग्राममंदिराला क्षेत्रभेट





टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- परिते ता. माढा येथील अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राथमिक विभागाने गावातील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, पोस्ट ऑफिस व ग्रामदैवत या ठिकाणी भेट देऊन गावातील अर्थव्यवस्था, शैक्षणिक कामकाज, ग्रामपंचायतीचे कामकाज, धार्मिक परंपरा कशा जपल्या जातात. याबाबतची माहिती शाळेचे संस्थापक राजेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना क्षेत्रभेटीतून देण्यात आली. गावातील नागरिक, शेतकरी, व्यावसायिक व नोकरदार वर्गातील लोकांचे बँकिंग व्यवहार कशाप्रकारे केले जातात. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः विड्रॉल भरून व डिपॉझिट रिसीट भरून प्रात्यक्षिकाद्वारे स्वतः अनुभव घेतला. शाखा व्यवस्थापक हनुमंत लामकाने यांनी मुलांना माहिती दिली. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या पालकांकडून बँकेमध्ये खाते काढून मासिक बचत करण्याचा सल्ला दिला. परिते येथील पोस्ट ऑफिसला भेट देऊन पत्रव्यवहार कसा चालतो हे प्रत्यक्ष पाहिले. यावेळी पोस्टमास्टर तांबोळी व पोस्टमन नागनाथ पावसे यांनी विद्यार्थ्यांना आपण लिहिलेले पत्र कशाप्रकारे पुढे जाऊन सॉर्टिंग होते व इच्छित स्थळी पोहोचते याबद्दल माहिती दिली. आपली ग्रामीण संस्कृती कशी जतन केली जाते. गावचे ग्रामदैवत या मंदिराचा इतिहास काय आहे याबाबतची माहिती गावकऱ्यांनी मुलांना दिली. यावेळी शाळेचे संस्थापक राजेश शेळके, मुख्याध्यापिका रूपाली शेळके, पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख सोनाली सरडे व मनीषा नागणे विद्यार्थी व पालक उपस्थित होते. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचा कारभार कशा पद्धतीने चालतो याची माहीती मुलांना देण्यात आली.


Reactions

Post a Comment

0 Comments